अमेरिका : इराण युद्धाने अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेने बुधवारी रात्री इराणच्या किनारी सुरक्षा यंत्रणा आणि क्षेपणास्त्र तळांवर भीषण हल्ले केले आहेत. या हल्ल्यात अमेरिकेने एक-दोन नव्हे तर तब्बल ५०० क्षेपणास्त्रे डागली. हे हल्ले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर होर्मुज सामुद्रधुनीतील व्यावसायिक जहाजांना धोका ठरणार्या इराणच्या लष्करी तळांवर करण्यात आले, अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे. दरम्यान, या भीषण हल्ल्यांत ३५ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.
अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर, इराणनेही अमेरिकेला थेट आणि ठकाशी ठक अशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. इराणने कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. यासाठी इराणने अत्यंत स्वस्त मात्र अचूक लक्ष्य साधणार्या कामिकेज ड्रोनचा वापर केला. हे स्वस्त आणि अधिक घातक ड्रोन असल्याचे इराणने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, हे छोटे ड्रोन विविध प्रकारच्या कामांसाठी वापरले जाऊ शकते. याशिवाय, इराणने हा हल्ला नज्म अब्दुल्लाह खालिद या इराकी नागरिकाला समर्पित केला आहे, ज्याला कुवेतने नुकतीच फाशी दिली.
ट्रम्प यांची ऊर्जा प्रकल्प उडवण्याची धमकी -
अमेरिका इराण युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली आहे. परिणामी जागतिक बाजारात ग्रूड ऑइलच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. क्रूड ऑइलचे दर महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा थेट धमकी दिली आहे. ङ्गङ्घजर इराण चर्चेच्या टेबलावर आला नाही, तर त्याचे ऊर्जा प्रकल्प आणि महत्त्वाचे पूल पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात येतील,ङ्घङ्घ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यावर, ङ्गङ्घचर्चेचे वातावरण तयार करण्याची जबाबदारी अमेरिकेची आहे. यामुळे जोवर अमेरिका हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होणे नाही,ङ्घङ्घ असे इराणचे परराष्ट्र प्रवक्ते इस्माईल बघई यांनी म्हटले आहे.
ग्रेटर टुनब वरही भीषण हल्ले -
या हल्ल्यांपूर्वी, अमेरिकेने बुधवारीच आखाती भागात इराणच्या ताब्यात असलेल्या ग्रेटर टुनब बेटावर तब्बल ९० मिनिटे क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या सहाय्याने जबरदस्त हल्ले चढवले. या सामरिक बेटावर अमेरिकेच्या सेंटकॉमने अचूक मारा कला आणि इराणची किनारपट्टी संरक्षण यंत्रणा, तसेच क्रूझ क्षेपणास्त्रांचे तळेही उद्ध्वस्त केली.
ग्रेटर टुनबच्या मालकीवरून इराण-वाद
खरे तर, पर्शियन आखातातील होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळील ग्रेटर टुनब हे एक अत्यंत महत्वाचे बेट आहे. हे बेट १०.३ चौरस किलोमीटरचे आहे. इराण आणि यांच्यात या बेटावरून वाद आहेत. मात्र, या बेटावर सध्या इराणचे वर्चस्व आहे. या बेटावरून, तेलवाहतूक करणार्या जहाजांवर नजर ठेवणे अत्यंत सोपे जाते. इराण याच बेटाचा वापर व्यावसायिक जहाजांवर हल्ले करण्यासाठी करत होता.